अहिल्याबाई होळकर सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्य दिन संपन्न
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.१६.०८.२०२६
अकोला – अहिल्याबाई होळकर सार्वजनिक वाचनालय नया अंदुरा जी. अकोला येथे ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रंथ मित्र रामेश्वर पोहेकर हे होते. मार्गदर्शक विश्रांती ताई तायडे, मिलिंद तायडे व राजेंद्र तायडे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रथमतः मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी या महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. त्यानंतर वाचनालयाच्या सचिव विश्रांती ताई तायडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शासन ग्रंथ मित्र पुरस्कृत रामेश्वर पोहेकर, तेल्हारा यांनी स्पर्धा परीक्षा विषयक २५ पुस्तकाचा संच वाचनालयाला भेट दिला. त्याबद्दल पोहेकर यांचा वाचनालयातर्फे सत्कार करण्यात आला. तसेच वाचनालयातर्फे शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टीने विश्रांती ताई तायडे यांनी विद्यार्थ्यांच्या आवडीची पुस्तके भेट देऊन मानवी जीवनात वाचनाचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेवटी अध्यक्षीय भाषणात ग्रंथ मित्र रामेश्वर पोहेकर यांनी सांगितले की, वर्तमानकालीन युग हे स्पर्धेचे युग असून या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमासोबत अवांतर वाचनाची आवड निर्माण करणे काळाची गरज आहे. त्यासाठी वाचनालयातील ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र तायडे स्पर्धा परीक्षा विभागामध्ये स्पर्धा परीक्षा विषयक साहित्य, स्पर्धा वार्ता साप्ताहिक, कुंभ विकास साप्ताहिक व चालू घडामोडी विषयक मासिके असे महत्त्वाचे साहित्य उपलब्ध असून बालविभाग, महिला विभाग व संदर्भ विभाग असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.
कार्यक्रमाला शिवाजी ठाकरे, अनिल गवई, दशरथ गवई, रामदास चंदनशिव, महादेव सपकाळ, पुरुषोत्तम बोळे, सुभाष वानखडे, वसु सर, विनोद दामोदर, गजानन चंदनशिव, संजू भाऊ उमाळे, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी प्रसेंजित तायडे, अंकित इंगळे, संस्कार इंगळे, आशिष उमाळे, दीपक चंदनशिव, वाचनालयाचे पदाधिकारी, कर्मचारी तथा सर्व वाचक, सभासद व ग्रंथ प्रेमी यांची आवर्जून उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन ग्रंथपाल वीरेंद्र तायडे यांनी केले व आभार प्रदर्शन वंदनाताई तायडे यांनी केले.



















