प्रथम: निर्भिड पत्रकार या वृतपत्रास पहिल्या अंकच्या अनेक अनेक सदिच्छा. सध्याची देशाची परिस्थिति पहिल्यास काही मुद्दे ठळकपणे समोर येतात ते म्हणजे प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत असे आजवर असे आजवर समाज मत मानत आले आहे. परंतु आजच्या घडीला समजामधे घडणाऱ्या घडामोडी आहे तशा व ज्या दाखवणे अतिशय आवश्यक आहे त्या न दाखविता इतर घटना दाखवण्यावर प्रसार माध्यमांचा सर्रास भर दिसून येतो. परंतु लोकशाही निकोप राहवी या साठी नि:पक्ष व निर्भिड असे एखादे वृत्तपत्र असणे ही काळाची गरज होती ती ओळखून श्री नंदकुमार जोगदंड यांनी अपार मेहनत घेऊन निर्भिड पत्रकार हे वृत्तपत्र चालू केले आहे. ही बाब निश्चीत कौतुकस्पद आहे. या वृत्तपत्राच्या नावतच निर्भिडपणा असल्यामुळे या वृत्तपत्राचा सरळ व सोप्या भाषेत लक्षात येतो. भारतीय समाजात देशाची एकात्मता टिकविणे ,भारतीय लोकशाही निकोप ठेवणे सामन्य जनतेचा आवाज जनते पर्यंत पोहोचविणे, राज्यकर्त्या पर्यन्त पोहोचविणे , वाचकांना चांगले व मौल्यवान असे विचारधारा देणे, वेगवेगळ्या योजनांची योग्य व परिपूर्ण अशी माहिती देणे या शिवाय राष्ट्रिय व अंतरराष्ट्रीय चालू घडामोडींची इत्यभूत माहिती आपल्या वाचकांना देणे अशी काही ध्येय आपण आपल्या या वृत्तपत्राच्या माध्यमातून पूर्णवत्वास नेण्याचा पर्यत्न करणार आहोत.यासाठी श्री नंदकुमार जोगदंड यांनी अतिशय वैचारिक, अभ्यासू व प्रशिक्षित अशी टीम आपल्या या कार्यात एकत्र गुंफली आहे त्यांच्या मध्यमातुन निर्भिड पत्रकार जनतेच्या सर्व वैचारिक गरजा पूर्ण करेल यात तीळ मात्रशंका नाही. हे वृत्तपत्र मराठी भाषेतील असल्याने मराठी भाषिक लोकांसाठी पर्वणीच ठरेल याची खात्री वाटते. महाराष्ट्रला थोर महापुरुषांचा वारसा लाभला आहे. ज्या मधे छ.शिवाजी महाराज, क्रांतिसुर्य जोतीराव फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होतो. या महापुरुषांचे विचार जनमाणसात पोहचविणे व त्यांचे स्वप्नं साकार करण्याच्या दृष्टीने वाटचाल करणे हे आपले ध्येय आहे. निर्भिड पत्रकार हा आपल्या लेखणीच्या माध्यमातून देशाची ही गरज नक्कीच पूर्ण करेल. देशातील मजूर व शेतकरी यांचे प्रश्न त्यांचा आवाज राज्यकर्त्या पर्यन्त पोहचविणे हे कार्य देखील निर्भिड पत्रकार नि:पक्षपतीपणे करेल यात अजिबात शंका नाही आपल्या नावा प्रमाणे निर्भिड पत्रकारीता करण्याच्या सदीच्छासह सर्व निर्भिड पत्रकार टिमचे अभिनंदन व पुढील वाटचालीस अनेक अनेक सदीच्छा.
किरण शिंदे
संपादक
मो. ९५४५४५८३६४


















