कराड, प्रतिनिधी. सुरज जाधव
उत्तर तांबवे येथील शाहिद जवान युवराज पाटिल प्रतिष्ठान यांच्या वतीने नवीन रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा. दि.१९ रोजी पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने म्हणून कराडचे मठाधिपती बाजीराव मामा कराडकर, कराडचे DYSP नवनाथ ढवळेे साहेब, स्वाभिमानीचे जिल्ह्याध्यक्ष सचिन नलवडे उपस्थित होते. शाहिद जवान युवराज पाटिल प्रतिष्ठान तर्फे रक्तदान शिबीर, रांगोळी स्पर्धा, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण इत्यादि कार्यक्रम दरवर्षी साजरे केले जातात. तसेच पंढरपुर वारिसाठी अन्नदान व डॉक्टर पथक दिले जाते. तसेच ट्रस्ट च्या माध्यमातून व्यायाम शाळा बांधली गेली आहे. येथे मोठ्या प्रामाणात युवक व्यायामा साठी येतात. ही सुविधा युवकांना मोफत दिली जाते. यावर्षी ट्रस्ट चे अध्यक्ष श्रीमंत पाटिल यांच्या विशेष प्रयतनातून ही रुग्ण वाहिका सेवा सुरु करण्यात आली आहे. तांबवे व परिसरातील वाड्या वस्तितील लोकांना दवाखान्यात जाण्यासाठी सुविधा उपलब्ध नव्हती, गंभीर आजार असणाऱ्या रुग्नन्ना, स्त्रियांना ही सुवीधा कमी दरात व वेळेत उपयोगी ठरणार आहे. यावेळी जिल्ह्या परिषद सदस्य प्रदीप पाटिल, तांबवे सरपंच कुंभारसो, नवीन RTO शीतल जाधव, Adv. विजय जाधव, दाजी पाटिल, Adv. पानस्करसो व ट्रस्ट चे सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.



















