चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)विकास खोब्रागडे
दि.११/१२/१८
चंद्रपुर, जिल्हयातील ताडोबा वाघ प्रकल्पात सुप्रसिद्ध असलेल्या संघरमगिरी येथे काल दिनांक १०डिसेंबर रोजी एका दुकानात काम करणाऱ्या राळेगाव येथील संजय तीतरे नामक व्यक्तीवर हल्ला करून वाघाने ठार केल्याची घटनेला एक दिवस पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा आज याच परिसरात ध्यानसाधना करण्यास बसलेल्या बौद्ध धम्म प्रचारक राहुल बोधी नामक बौद्ध भिक्खू वर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना घडली आहे. दुपारी १२.३० वाजता च्या दरम्यान ३ बौद्ध भिखु ध्यान करत असतांना राहुल बोधी नामक बौद्ध भिखू वर बिबट्याने हल्ला केला असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या महिन्यातली पाचवी घटना आहे.या बिबट्याने आतापर्यंत ४ जणांचे बळी घेतले असल्याचे समजते. सदर घटनेमुळे गावपरिसरात भीतीचे वातावरण पाहण्यास मिळत असून बिबट्याला पकडण्यास वनविभाग तारेवरची कसरत करतांना दिसून येत आहे.सदर बिबट्याला लवकरात लवकर पकडण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.



















