चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.२८/१२/१८
चिमूर, पंचायत समिती सदस्य ग्रामीण भागाचा कणा असून नगर विकास यंत्रणेच्या निकषानुसार पंचायत समिती सदस्यांना ग्राम विकास विभाग कडून ५० लक्ष प्रतिवर्ष निधी उपलब्ध करून देण्याच्या आदी मागण्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी चिमूर मार्फत सभापती विद्या चौधरी व उपसभापती शांताराम सेलवटकर यांच्या पुढाकारातून निवेदन देण्यात आले असून आज सर्व सदस्यांनी मासिक सभेवर बहिष्कार टाकला.पंचायत समिती सदस्य हा जनतेतून निवडून येत असताना त्यांना कोणतेही निधी मिळत नसल्याने त्या क्षेत्रातील विकास कामांना खीळ बसत असते त्या मुळे पस सदस्यांवर रोष व्यक्त केल्या जात आहे.प.स.सदस्यांना १३ व्या वेतन आयोग प्रमाणे पुढील वित आयोगाच्या निधी मध्ये वितरणाची तरतूद करावी, स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद च्या निवडणुकी साठी मतदान करण्याचा अधिकार देण्यात यावा,पस सदस्यांना ५० लक्ष रुपये निधी देण्यात यावा, जिल्हा नियोजन समिती मध्ये सभापतींना सदस्य म्हणून घ्यावे, सार्वजनिक व वैयक्तिक लाभाच्या योजनेची मान्यता देण्याचा अधिकार प.स.सदस्य सभागृहाला देण्यात यावा,कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये स्वीकृत सदस्य घेण्यात यावे,प.स.सदस्य मधून विधान परिषद वर प्रतिनिधित्व देण्यात यावे, सभापती व बिडीओ यांचे संयुक्त खाते असावे, प.स.मध्ये अधिकारी व कर्मचारी यावर नियंत्रण असावे अशी तरतूद असावी, मनरेगा कामांना मंजुरी देण्याचा अधिकार देण्यात यावा,प.स.सभापती व उपसभापती याना पेन्शन देण्यात यावा,वाढीव मानधन लागू करण्यात यावा, घरकुल मंजुरी अधिकार प.स.सदस्य समितीला देण्यात यावा,अन्नपूर्ण अंत्योदय लाभार्थी वाढीव मानधन लागू करण्यात यावे,सभापती ला स्वंतत्र वाहन देण्यात यावे,१४ व्या वित आयोगाचे नियोजन करणे व आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार प.स.सभागृहाला देण्यात यावे इत्यादी मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी भैय्यासाहेब बेहरे मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले असून निवेदन देत असताना सभापती विद्या चौधरी,उपसभापती शांताराम सेलवटकर,गटनेते रोशन ढोक,पस सदस्य पुंडलिक मत्ते,अजहर शेख,प्रदीप कामडी,भावना बावनकर,लता पिसे, गीता कारमेगे आदी उपस्थित होते.



















