सोलापूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२६.०५.१९
महाराष्ट्र कृती समितीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र रिक्षा पांचयत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी रिक्षा चालकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी नुकताच सोलापूर दौरा केला या वेळी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रिक्षा संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी तानाजी मसळकर,राजगुरू महाराज,महिपती पवार, राजू शिदगणे,महादेव गायकवाड,लखन लोंढे,भिमराव कुलकर्णी,मुकेश धोत्रे आदी उपस्थित होते.या वेळी रिक्षा चालकांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली,रिक्षा संघटना वाढविणे,संघटन मजबूत करणे या सह इतर विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली.महाराष्ट्रातिल रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच राज्यव्यापी बैठक घेण्यात येणार असल्याचे या वेळी बाबा कांबळे यांनी सांगितले.महिपती पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील रिक्षा चालकांच्या विविध समस्या मांडल्या सोलापूर जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.



















