सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२९.०६.१९
फलटण- एस टी स्टॅन्ड मध्ये चिखलाचा बाजार तर एस टी स्टॅन्ड समोर गटारीचा रस्ता असे दिसत आहे. फलटण मधील काॅलेज महाविद्यालय सुरू झाल्याने आसपासच्या सर्व गावामधून विद्यार्थी व पालक यांची अॅडमिशन साठी धावपळ सुरू आहे. अशा धावपळी मध्ये एस टी ने आलेल्या सर्वांना एस टी मधून उतरावेच वाटत नाही तर उतरले तर रोड वर येऊ नये असे वाटते एस टी स्टॅन्ड च्या समोर नगरपालीकेच्या गटारीचे काम तसेच आहे या गटारी च्या घाणी पासुन येणार्या जाणार्या नागरीकांना व विद्यार्थ्यांनां खुप त्रास सोसावा लागत आहे. हे गटारे सांडपाण्याची आहेत की मोबाईल,इंटरनेटच्या केबल वायर साठी केलेली आहेत. नगरपालीका आणि मोबाईल ,इंटरनेट, केबल वाल्यांचा काही सबंध आहे की काय ? असे पहवयास मिळत आहे. ही गटारे नगरपालीका कधी पुर्ण करेल आणि नागरीक व विद्यार्थी यांना होणारा त्रास बंद करेल का ? अशा वेळी पाऊसाला सुरूवात झाल्याने टचांई ग्रस्थं भागातील ग्रामस्थांना थोडासा दिलासा मिळत आहे तर ऐकीकडे बस स्टॅन्ड चिखलाचे तर बस स्टॅन्ड समोर गटारी,घाणीचे साम्राज्य पाहवयास मिळत आहे.तरी नगरपालीका अधीकारी व बसस्थानकचे अधिकारी हे नागरीकांचे व विद्यार्थ्यांचे त्रास थांबवतील का?असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्या वाचून रहात नाही.



















