सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,गोविंद मोरे
दि.३०.०६.१९
महाबळेश्वर – पाचगणी रस्त्यावर जीप टँकरवर आदळून झालेल्या अपघातात दोन युवक ठार तर सातजण जखमी झाले. जखमींना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झाला आहे.महाबळेश्वरला सहलीसाठी आलेल्या उस्मानाबाद येथील युवकांच्या जीपने (एम एच २५आर९२६८) समोरून येणाऱ्या टँकरला (एम एच ०४बीसी०५८९)जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की यात चालकासह दोन युवक जागीच ठार तर आठ जण गंभीर जखमी झाले. अपघातात चालक अक्षय महादेव काळे हे जागीच ठार झाले आहेत. या आपघातात अरबाज राहिमतुल्ला शेख (वय२१),अनिकेत भातमरेकर(वय२०),कृष्णामगर(वय२२),वसंत ज्ञानेश्वर कदम(वय२१),दिगंबर गायकवाड(वय२२)ऋषिकेश विलास नाईक(वय२०),शेखर वासुदेव धंगेकर(वय१९),पंकज प्रल्हाद कावळे(वय१९),जखमी झाले आहेत व सर्वजन उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत .या घटनेची नोंद पाचगणी पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विवेक बडवे करत आहेत.



















