सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अनिल माने
दि.३०.०६.१९
◆ कराड-चिपळूण चौपदरी रस्त्यांवर ओढ्या-नाल्याचे साम्राज्य.
पाटण- तालुक्यातील हा भाग डोंगराच्या कुशीत वसलेला तालुका असून निसर्ग सौंदर्याने फुललेला असा तालुका आहे. म्हणून अलीकडच्या काळात पाटण तालुका हा पर्यटन स्थळ म्हणून नावा रुपाला आल्याने पाटण तालुक्यातील पर्यटन स्थळे पर्यटकानीं गर्दी करू लागला आहे. परंतु गेले दोन वर्ष झाली कराड, पाटण,ते चिपळूण या रस्त्याचे रुंदीकरनाचे काम चालू आहे याच रस्त्यावरून पर्यटक मोट्या प्रमाणात प्रवास करत आहेत.परंतु रस्त्याचे रुंदीकरण का प्रवाशाचे मोफत मरण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.दे धक्का असा प्रवास प्रवाशांचा चालु आहे .पाटण तालुक्यातील कोयना परिसर हे पर्यटनाचे प्रमुख केंद्र असल्याने पर्यटक या भागात येत आहेत, परंतु मुसळधार पडणारा पाऊस आणि रस्त्याचे डांबरीकरण झाले नसुन डबरीकरण झाले आहे.त्यामुळे पर्यटकांना धक्के बूक्के घेत प्रवास करावा लागत आहे. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावर ओढ्या-नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे तर काही ठिकाणी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाल्याने प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.पाऊस काळामध्ये या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोफत मृत्युची सप्रेम भेट मिळेल यात शंका नाही.



















