चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.२९.११.१९
चिमूर- महाराष्ट्र राज्याच्या विधानभवनावर महाराष्ट्र विकास आघाडीची सत्ता स्थापन होताच गुरुवारी रात्री शिवसेना कांग्रेस राष्ट्रवादी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. चिमूर शहरातील वडाळा येथून बाईक रॅली फटाक्यांची आतिषबाजी करत, राष्ट्रसंत चौक इंदिरा चौक, नेहरू चौक, रायपूरकर चौकातून शिवाजी चोक येथे आली, शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून अभयनकर मैदानावरील महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उत्सव रॅलीची सांगता केली.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी उद्धव ठाकरे व मंत्री म्हणून शिवसेनेसह कांग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस च्या आमदारांनी शपथ घेतली. मागील पाच वर्षे भाजपची सत्ता होती या निवडणुकीमध्ये शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपाला सत्तेपासून दूर केलं, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्सवाचे वातावरण दिसून येत होते. जल्लोष रॅली मध्ये जि.प.गटनेते डाॅ.सतीश वारजूरकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते, राष्ट्रवादीचे सुरेश रामगुंडे, माजी उपजिल्हा प्रमुख धर्मसिंह वर्मा, संजय डोंगरे, शिवसेना नगरसेवक उमेश हिंगे, माधव बिरजे, श्रीनिवास शेरकी, रमेश भिलकर, विलास डांगे, किशोर उकुंडे, अविनाश अगडे, विनोद ढाकुनकरं, व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



















