नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, शांताराम दुनबळे
दि.३०.११.१९
नाशिक- सिडकोसह अबंड व इतरही भागातील राणाप्रताप चौक, दत्तचौक दतनगर येथे मोकाट सुटलेले श्वान यांनी लहान मुलांवर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे उतमनगर येथे नंदिनी खैरणार या मुलीवर दतचौक येथे वैदेही सोनवणे या मुलीवर मोकाट श्वान यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले आहे त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. सिङको भागात श्वान हल्ल्यामुळे अनेक नागरिकांना जखमी व्हावे लागले असल्याने सिडको महापालिका प्रशासन त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला जात आहे. रातरीच्या वेळी मोकाट श्वानांचा वावर वाढल्याने रात्री रस्त्यावर पायी जाणारे, सायकल दुचाकी वर जाणारे नागरिकांच्या अंगावर धावून जात त्यांना चावा घेत आहेत. या कुत्र्या पासुन वाचण्याची कसरत करताना अपघात होऊन अनेकांना जखमी व्हावे लागले आहे. सिडको भागात श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सिङको महापालिका प्रशासन श्वान निबिर्जीकरणाचा लाखो रुपये खर्च करून ठेका दिला जात असताना दुसरीकडे श्वान कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने विरोधात्मक चित्र निर्माण होत आहे, श्वान निबिर्जीकरण हे फक्त नावालाच असुन त्याबाबत योग्य पध्दतीने कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला असुन चौकशीची मागणी केली आहे सिडको महापालिकेची श्वान निबिर्जीकरण पकडणारी गाडी दुपारी किंवा सकाळी येत असते ही गाडी जेव्हा येते तेव्हा अनेक श्वानांनी त्या जागेवरून धुम ठोकलेली असते. त्यामुळे हाती काहीच लागत नाही तर हेच गायब झालेले श्वान रात्रीच्या वेळी रस्त्यावर टोळकी करून दिसत असल्याने श्वान निबिर्जीकरण पकडणारी मोहीम रात्रीची राबवावी अशी मागणी केली जात आहे. सिङको तील लाखो नागरिकांच्या सोयीसाठी मोरवाडी येथे महापालिकेचे रूग्णालय असुन याठिकाणी चौवीस तास डाॅक्टर व रेबीजची लस उपलब्ध असणे गरजेचे असताना रेबीजची लस उपलब्ध नसल्याने रूग्णालयात रुग्णांची हेळसांड होत असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला जात आहे लोकप्रतिनिधीनी योग्य पाठपुरावा करण्यात येवून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.



















