उस्मानाबाद(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, अभय गायकवाड
दि.२.१२.१९
उस्मानाबाद- लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल सलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय व तालुका ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात एड्स (AIDS) माहितीस्तव विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.आर.यु. सुर्यवंशी व बी.एल.जाधव सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रॅलीत विद्यार्थ्यांनी H.I.V.AIDS विषयी नागरिकांत जनजागृती केली. या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















