सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, सुभाष जाधव
दि ३.१२.१९
फलटण- स्वामी समर्थनगर ५ सर्कल खामगाव ता. फलटण येथे श्री.परमपूज्य नवनाथ (उमेशगीरी महारा ) यांचे आशिर्वादाने श्री. दतजयंती सोहळा महोत्सव निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि.३ डिसेंबर पासुन श्री. दत्त नवरात्र प्रारंभ होणार असुन दैनंदिन कार्यक्रमामधे श्री. गुरूचरित्र पारायण, अखंड नामजप, भजन, माधुकरी (ग्रामदिक्षा) होणार आहे. मंगळवार दि. १० डिसेंबर रोजी गुरुचरित्र पारायण समाप्ती व संध्याकाळी ४ ते ७ वाजता ग्राम भिक्षुकी आणि दत्त पादुकांची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. बुधवार दि.११ डिसेंबर रोजी श्रीदत्त जयंती सोहळा निमित्ताने पहाटे ५ ते ७ वाजता श्रींना अभिषेक, महापूजा व आरती, सकाळी ९ ते १० वाजता श्री.नवनाथ गिरी (उमेश) महाराज यांची माधुकरी (ग्रामभिक्षुकी), दुपारी १२ वाजता श्रींची महाआरती, दुपारी १२ते २.३०वाजता अखंड नामजप, श्री. दत्तयाग ( गो, श्वान, अश्व, पृथ्वी, वृक्ष आदी पूजन) होणार आहे. दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत महाप्रसाद , दुपारी १ ते ५ श्री. दत्त सांप्रदायिक भजन, सायंकाळी ६ वाजता श्री. दत्त जन्म व महाआरती होणार आहे. स्वामी समर्थनगर ५ सर्कल खामगाव ता. फलटण येथील श्री दत्त मंदिर जागृत स्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असून श्री.दत्त जयंती सोहळा यामध्ये भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. परिसरातील सर्व भाविक भक्तांनी श्री. दत्त जयंती सोहळ्यामध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.



















