निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.०५.०१.२०२०
बगदाद- शनिवारी रात्री इराकची राजधानी बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासासह अन्य काही ठिकाणांवर रॉकेट हल्ला करण्यात आला. गेल्या दोन दिवसांत अमेरिकेकडून इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यांनतर ही घटना घडल्याने या मागे इराण असल्याचं म्हटलं जात आहे. कासिम सुलेमानी हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. इराणनं रॉकेट हल्ला करून मशिदीवर लाला झेंडा फडकवल्यानं युद्धाची ठिणगी पडली असल्याचं सांगितलं जात आहे. शत्रूंना सोडणार नाही. अमेरिकेचं सैन्य युद्धासाठी सज्ज असल्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिकेनं आपलं कुवेतमधील सैन्य बगदादमध्ये हलवलं आहे. अमेरिकेकडून ३ हजार सैनिक आखाती देशांमध्ये पाठवण्यात आले आहेत. अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर सज्ज झाली आहे. दोन नवी जहाजे, सैनिक आणि इतर सामग्री अमेरिकेकडून आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पाठवण्यात आली आहे. अमेरिका आणि इराणमधील युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत.
अमेरिकेने गुरुवारी रात्री इराणचा टॉप कमांडर कासिम सुलेमानी याला रॉकेट हल्ल्यात ठार केलं होतं. त्यानंतर पुन्हा शनिवारी अमेरिकेने हवाई हल्ला केला होता. यात ६ जण ठार झाले होते. या हल्ल्याला प्रतित्युत्तर देण्यासाठी इराणनं रात्री उशिरा अमेरिकेच्या मशिदीवर लाल झेंडा फडकवला तर सैन्यतळावर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.

















