चंद्रपूर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०५.०१.२०२०
चिमूर- ताडोबा बफर झोन लागत वसलेल्या आदिवासी बहुल पिपर्डा गावातील शिक्षणप्रेमी व्यक्तींना प्रथम एज्युकेशन फॉउंडेशन च्या प्रतिनिधीने एक कल्पना सुचविली. गावातील सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक महिन्याला कोणत्याही विषयावर एक परीक्षा घेणे या स्वरूपाची ती संकल्पना होती. ही संकल्पना गावातील शिक्षणप्रेमी लोकांना खूप आवडली. त्यासाठी एक परीक्षा मंडळ नियुक्त करण्यात आले. परीक्षा मंडळाने मागील महिन्याच्या गणित दिवसाचे औचित्य लक्षात घेऊन गणित हा विषय यावेळी निवडला होता. सर्वानुमते तीन गटात परीक्षा घेण्याचे ठरविण्यात आले. ते गट वर्ग १-२, वर्ग ३-५ आणि वर्ग ६-८ या स्वरूपाचे असतील असे ठरले. परीक्षा मंडळाने विशिष्ट संरचनेत प्रश्नपत्रिका तयार केल्या. परीक्षेचे आयोजन हे सुट्टीच्या दिवशी करण्यात आले. त्यामागे एक उदात्त हेतू लपला होता. तो म्हणजे गावातील सर्व शाळेतील, सर्व माध्यमाची मुले सामावून घेता यावी. आज दिनांक ५ जाने. २०२० रोजी रविवारला सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालय पिपर्डाच्या प्रांगणात परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील मुलांनी उत्तम प्रतिसाद दिला. या संपूर्ण परीक्षेच्या यशस्वीतेसाठी मा. दशरथ सहारे, मा.भारत भेंडारे, मा.डॉ.सहारे, मा. दयानंद पा.बोरकर, मा.विलास पा. बोरकर, मा.विकास खोब्रागडे (निर्भिड पत्रकार प्रतिनिधी) मा.नीलकंठ पा.बोरकर, मा. नरेंद्रजी गेडाम, मा.पल्लवी बोरकर, मा. जयश्री बोरकर, मा.तुळशीदास खोब्रागडे, मा.हंसदास कळाम, मा.अमोल देऊलवार, मा.अतुल मेश्राम, मा.कुणाल रामटेके, मा.समीर मेश्राम, मा.मनोज खोब्रागडे, मा. प्रमोद मेश्राम, मा.प्रमोद पा.बोरकर, मा.जगदीश देऊलवार, मा.शुभम चुनारकर, मा.भक्तदास मेश्राम इत्यादी गावातील शिक्षनाग्रही व्यक्तींनी कष्ट घेतले. विशेष म्हणजे या परीक्षेच्या आयोजनावरील संपूर्ण खर्च लोकसहभागातून करण्यात येत आहे.



















