नाशिक (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, महेश दारूंटे
दि.२७.०२.२०२०
येवला- जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित एस. एन. डी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येवला येथे विद्यार्थी विकास मंडळ आयोजित मराठी राजभाषा गौरव दिन संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब आंधळे अध्यक्ष स्थानी होते. तसेच महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा. सुनिल खैरनार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. महाविद्यालया तर्फे वरील मान्यवरांचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. ठाकरे एस. बी. यांनी केले. कवी कुसुमाग्रज जन्मदिन, मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून महाविद्यालयात साजरा करण्यात आला. विद्यार्थी विकास मंडळ आयोजित काव्य वाचन व वकृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले, या स्पर्धां मध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सुनिल खैरनार यांनी आपल्या महाराष्ट्राला संताची परंपरा लाभलेली आहे. कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्यातुन मराठी भाषातील साहित्य है आपल्या जीवनात कशे महत्वाचे आहे है विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भाऊसाहेब आंधळे यांनी मातृभाषा ही जीवनाची शिदोरी असून तिची साथ माणसाला आयुष्यभर पुरते. मराठी राजभाषामुळे लेखन, वाचन, श्रवण, संभाषण या द्वारे व्यक्ती आपल्या ज्ञानाच्या पातळीत वाढ करू शकतो. त्यामुळे माणसाच्या जीवनात मराठी मातृभाषा एक अमृतच आहे. असे मौलिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. दिपक मढवई, यांनी केले. आभार प्रा. संतोष आहेर यांनी मानले.
या प्रसंगी प्रा. धनगे जी. बी., प्रा. काथेपुरे जी. पी., प्रा. करंजकर एस. एम., प्रा. माधव बनकर, प्रा. ललित घाडगे, प्रा. नितीन साळवे, प्रा. अमोल पवार, प्रा. सुनिल पवार, प्रा. मोहित गवारे, प्रा. अजय आदमाने, प्रा. बाबसाहेब गाडेकर, प्रा. भाऊसाहेब जाधव, प्रा. आण्णा व्हडगळ, प्रा. महेंद्र म्हसे, प्रा.लक्ष्मण देवढे, प्रा. तृप्ती काळंगे, प्रा. साळवे, प्रा. देवकर, प्रा. अश्विनी मोरे, प्रा. निता मोरे, प्रा. जयश्री आहेर, प्रा. रचना भागवत, प्रा. सोमनाथ डूबे प्रा. चव्हाणके, श्री. दीपक जाधव, प्रा. कुणाल भावसार, सौ. सुखदा देवगावकर, प्रा. अफसाना कादरी, श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, श्री. नवनाथ सुराळकर, श्री. श्रावण गायकवाड, श्री. किरण मुंढे व श्री. प्रवीण मोरे सौ. मेनकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.



















