मुंबई(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२८.०२.२०२०
🔹 आज शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच, मुंबई शेअर बाजाराचा (BSE) निर्देशांक (Sensex down) तब्बल १ हजारपेक्षा जास्त अंकांनी कोसळला.
मुंबई- कोरोना व्हायरसचा (coronavirus impact) कहर आता शेअर बाजारात (Sensex down) दिसत आहे. कारण शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच, मुंबई शेअर बाजाराचा (BSE) निर्देशांक (Sensex down) तब्बल १ हजारपेक्षा जास्त अंकांनी कोसळला. शिवाय राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीतही २९४ अंकांनी घट झाली. अवघ्या पाच मिनिटात गुंतवणूकदारांचा तब्बल ५ लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला. बाजार उघडल्या उघडल्या सेन्सेक्समध्ये आधी ६५८ अकांनी घट झाली. त्यामध्ये आणखी घट होऊन सकाळी ९.३९ वाजेपर्यंत बाजार तब्बल ११३० अंकांनी गडगडून सेन्सेक्स ३८६१५ अंकांवर पोहोचला.
आंतरराष्ट्रीय व्यापारात चीनचे ज्या देशांची व्यवहार आहेत, त्यांना फटका बसला आहे. गेल्या तीन दिवसात सेन्सेक्समध्ये १५०० अंकांची घसरण झाली. फॉरेन इन्व्हेस्टर्स शेअर विकून पळ काढत आहेत, त्यामुळे शेअर बाजारावर त्याचा नकारात्मक परिणाम होत आहे, असं बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी सांगितलं.



















