नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२८.०२.२०२०
नाशिक- एस. एन. डी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दुबे सर तसेच प्राचार्य डॉ. भाऊसाहेब आंधळे अध्यक्ष स्थानी होते. वरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. महाविद्यालया तर्फे वरील मान्यवरांचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. सुनिल खैरनार सरांनी केले. या नंतर कॉलेज च्या विद्यार्थी धनश्री गायकवाड, कल्यानी गोसावी, सागर वाघ, वैभव भड, गायकवाड प्रतिक, अभिषेक मढे, या विद्यार्थी आपले विचार व्यक्त केले. या विज्ञान दिनाचे औचित्य साधुन विद्यार्थ्यांनी आधुनिक पध्दतीचा गोबर गॅस, ध्वनी तरंग उपयोग, प्रयोगामध्ये हाताची टाळी वाजवल्या वर घरातील बल्फ चालु होतो व दुसरी टाळी वाजवल्या वर बंद होतो. रक्त भिसरण संस्था याचा उपयोग इ. प्रकारचे नविन उपकरणाचा शोध विद्यार्थ्यांना दाखवले. ज्याचा उपयोग हा देशाच्या चांगल्या कामा साठी होऊ शकतो. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. दुबे सरांनी विज्ञानचा जन्म हा आपल्या कल्पना शक्ती च्या जोरावर होत असतो. बदलत्या काळा नुसार विज्ञानात बदलत होत असतात. जशी कल्पना शक्ती निर्माण होती तस तसी विज्ञाना मध्ये नवनवीन शोध लागत जातात म्हणुन कल्पना ही खुप महत्वाची असते. विज्ञान चा उपयोग ज्या प्रमाणे मानवाच्या चांगल्या कामासाठी आहे तसाच मानवाच्या विनाशासाठी देखील आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब आंधळे सरानी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे नवनवीन शोध लावावे. जे काही सहकार्य लागेल ते कॉलेज पुर्ण करेल असे आश्वासन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. भाऊसाहेब जाधव यांनी केले. आभार विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. ललित घाडगे यांनी मानले.
या प्रसंगी प्रा. धनगे जी. बी., प्रा. संतोष आहेर, प्रा. काथेपुरे जी. पी., प्रा. करंजकर एस. एम., प्रा. माधव बनकर, प्रा. नितीन साळवे, प्रा. अमोल पवार, प्रा. सुनिल पवार, प्रा. मोहित गवारे, प्रा. अजय आदमाने, प्रा. बाबासाहेब गाडेकर, प्रा. भाऊसाहेब जाधव, प्रा. आण्णा व्हडगळ, प्रा. महेंद्र म्हसे, प्रा.लक्ष्मण देवढे, प्रा. तृप्ती काळंगे, प्रा. साळवे, प्रा. देवकर, प्रा. अश्विनी मोरे, प्रा. निता मोरे, प्रा. जयश्री आहेर, प्रा. रचना भागवत, प्रा. सोमनाथ डूबे प्रा. चव्हाणके, श्री. दीपक जाधव, प्रा. कुणाल भावसार, सौ. सुखदा देवगावकर, प्रा. अफसाना कादरी, श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, श्री. नवनाथ सुराळकर, श्री. श्रावण गायकवाड, श्री. किरण मुंढे व श्री. प्रवीण मोरे सौ. मेनकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.



















