दिल्ली(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०६.०३.२०२०
नवी दिल्ली- टाटा स्कायने आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. जानेवारी महिन्यात कंपनीने सेटटॉप बॉक्सच्या किंमतीत कपात केली होती. मात्र, ट्रायने एनटीओ २.० लागू केल्यानंतर ग्राहकांना आता टाटा स्कायसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. एसडी आणि एचडी सेटटॉप बॉक्सच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे आधी १३९९ रुपयांत उपलब्ध होणाऱ्या टाटा स्कायच्या एचडी (हाय डेफिनेशन) सेटटॉप बॉक्सची किंमत १४९९ रुपयांवर पोहोचली आहे.
टाटा स्कायने सेटटॉप बॉक्सची किमतींबरोबर कंपनीने मल्टी टीव्ही कनेक्शनच्या दरातही वाढ केली आहे. टाटा स्काय एसडी मल्टी टीव्ही कनेक्शनसाठी आधी १२९९ रुपये लागत त्यासाठी आता १३९९ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच एचडी मल्टी टीव्ही कनेक्शनची नवी किंमत जी आधी ९९९ होती, त्यासाठी आता ११९९ रुपये द्यावे लागतील.
मल्टी टीव्ही कनेक्शनच्या किंमतीत वाढ झाल्याची माहिती DreamDTH ने दिली आहे. नवी किंमत टाटा स्कायच्या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकता.



















