मुंबई(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०६.०३.२०२०
मुंबई- ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसकल्पात राज्यातील विविध बांधकाम व प्रकल्पानां चालना देण्यासाठी रकमेची तरतुद करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प मांडताना अजित पवार यांनी पेट्रोल-डिझेलवर प्रति लिटर १ रुपयांचा कर लावण्यात येणार असल्याचं म्हटलं.
पेट्रोल-डिजेलवर प्रति लिटर १ रुपयांचा कर लावणार असल्यानं भविष्यात पेट्रोलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईत सद्यस्थितीत पेट्रोलची किंमत ७६.८३ रुपये आहे, तर डिझेलची किंमत ६६.८२ रुपये आहे. पेट्रोलची किंमती ७६ असल्यानं चालकांना दिलासा मिळत असतानाच, भविष्यात यामध्ये वाढ झाल्यास खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.
• राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत मांडला.
अर्थसंकल्पातील काही महत्वाचे मुद्दे…
मुंबई पुण्यात मुद्रांक शुल्कात एक टक्का सूट देण्याची घोषणा
नाट्य संमेलनासाठी दहा कोटींचे अनुदानतृतीयपंथीयांच्या स्वतंत्र मंडळासाठी ५ कोटी
मुंबईत वस्तू आणि सेवा केंद्र उभारणार, वस्तू आणि सेवा केंद्रासाठी १४८ कोटी रुपये
मुंबईत मराठी भाषा भवन
नवी मुंबईत महाराष्ट्र भवन बांधणार
वरळीत पर्यटन संकुल उभारणार
दररोज एक लाख शिवभोजन थाळ्या
शिवभोजन थाळीसाठी १५० कोटींची तरतूद
कबड्डी, कुस्ती, खो खो, व्हॉलिबॉल स्पर्धांचं आयोजन
महिला बालविकास विभागासाठी २ हजार ११० कोटी
किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन उपब्लध करून देण्यात येईल
दहावी उत्तीर्ण व्यक्तींना रोजगार प्रशिक्षण
२१ ते २८ वर्ष वयोगटातील बेरोजगारांना सक्षम करणार,
पाच वर्षात १० लाख बेरोजगारांना प्रशिक्षण
महामंडाळाच्या बसेसं बदलून वायफाययुक्त बस देणार
जुन्या एसटी बस बदलून नवीन सुविधा युक्त बस देणार
एसटी महामंडळासाठी निधीची तरतूद
प्राथमिक आरोग्यासाठी ५ हजार कोटीची तरतूद
मेडिकल डीग्रीच्या ११८ जागा वाढवणार
नव्या रुग्णवाहिकांसाठी २५ कोटी, जुन्या रुग्णवाहिका दोन वर्षांत बदलणार
मुंबई-गोवा महामार्गासाठी केंद्राकडून १२०० कोटींचा निधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची चर्चा, गडकरींचे आभार.



















