पुणे(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०२.०३.२०२०
पुणे- बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संघटनेची तातडीची बैठक शासकीय विश्राम गृह पुणे येथे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये अत्यंत उत्साहात पार पडली.संघटनेच्या पुढील वाटचालीची दिशा ठरविण्यासाठी ही मिटिंग आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये संघटनेच्या शहरातील शाखा विस्तारावर देखील सखोल चर्चा झाली असून लवकरच शहरातील विविध भागात संघटनेच्या नवीन शाखांचे ओपनिंग होईल अशी माहिती रघुनाथ कदम यांनी दिली. या बैठकीस पिंपरी चिंचवड विभागाचे अध्यक्ष संदीप जोगदंड, सुमित गायकवाड, केतन जगताप, पै.अमित माने, विकास ओव्हाळ, रामचंद्र सोनकांबळे, कृष्णा अदमाने, निर्भीड पत्रकार या वृत्तपत्राचे मुख्य संपादक नंदकुमार जोगदंड, युवराज जाधव, संजीत खारवे, पंकज सोनकांबळे, अनिल गोरे, अमोल माटे, कमलाकर गायकवाड, राजू गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.



















