मुंबई(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१४.०३.२०२०
मुंबई- केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये ३ रुपयांनी वाढ केली आहे. केंद्र सरकारने अधिसूचना जारी करत ही माहिती दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लीटर ३ रुपयांनी वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये ३ रुपयांनी वाढ केली आहे. केंद्र सरकारने अधिसूचना जारी करत ही माहिती दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लीटर ३ रुपयांनी वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्पादन शुल्कात वाढ केल्यामुळे पेट्रोलच्या दरात प्रति लीटर २ रुपये ते ८ रुपयांनी वाढ होणार आहेत. तर डिझेलच्या दरात प्रति लीटर ४ रुपयांनी वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.



















