चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, विकास खोब्रागडे
दि.१५.०३.२०२०
चंद्रपूर- जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींचे पदग्रहण समारंभ आज पार पडले. यावेळी, समाजकल्याण समिती सभापती म्हणून नागराजजी गेडाम, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती म्हणून सुनिलजी उरकुडे, अर्थ व बांधकाम समिती सभापती म्हणून राजुजी गायकवाड तर महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून सौ. नीतूताई चौधरी यांनी आपापल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
यावेळी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी समारंभाला उपस्थित राहून सर्व विषय समिती सभापतींना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आणि आपल्या संपूर्ण टीमच्या वतीने जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात विकासकामे व्हावीत. जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या समस्या सोडविण्यासाठी तुम्ही प्राथमिकता द्या. तुमच्या कार्यामुळे गोरगरिबांच्या चेहर्यावर समाधान दिसेल असे कार्य तुमच्या हातून पार पडावे. या सदिच्छेसह मी तुम्हा सर्वांचे याठिकाणी पुनःच्छा अभिनंदन करतोय. असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
तसेच कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलतांना, आदरणीय भाऊ आपल्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन जिल्ह्यातील ग्रामीण भागाला न्याय देण्यासाठी मी व माझे सर्व सहकारी एक उत्तम टीम वर्क म्हणून कार्य करू. आणि जिल्ह्यातील विकासकामांच्या आवश्यक निधीसाठी
आपल्याकडे नेहमी पाठपुरावा करू. आज जिल्ह्यात फार प्रमाण नसले तरी वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर खबरदारी म्हणून आम्ही आरोग्य विभागाच्यावतीने यंत्रणा तयार करत आहोत. त्यासाठीही आपल्याकडून आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे. असे मत जि. प. अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांनी व्यक्त केले.
तसेच माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजभैय्या अहीर यांनीही याप्रसंगी पदस्थ झालेल्या सभापतींचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पार पडलेल्या या कार्यक्रमाला, माजी आमदार अॅड. संजयभाऊ धोटे, व.वि.म. माजी अध्यक्ष चंदनसिंहभैय्या चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरिशभैय्या शर्मा, जि. प. उपाध्यक्षा सौ. रेखाताई कारेकार, माजी जि. प. अध्यक्ष तथा गटनेते देवरावजी भोंगळे तथा सर्व मा. माजी सभापती, जिल्हा परिषद सदस्य, सदस्या मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे साहेब, वित्त व लेखा अधिकारी मातकर साहेब यांसह पदाधिकाऱ्यांचे शुभचिंतक तथा जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



















