चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१८.०३.२०२०
चिमुर- नेरी मार्गवारील गस्ती दरम्यान दारू सान्यासह गुप्त महितीच्या आधारे दारूसाठयासह मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कार्यवाही चिमुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक स्वप्निल धुळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली, चंद्रपुर जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मोठ्या प्रमाणात दारू तस्करीचे प्रमाण सुरु आहे, दरम्यान चिमुर पोलिसांनी विशेष मोहिम दारू पकड़न्यासाठी सुरु केली आहे, दिनांक १७ मार्च मंगळवारला रात्रीच्या सुमारास गस्तिवर असताना गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली, या माहितीच्या आधारे पोलिसांनी या चिमुर नेरी रोडवरील सोनेगांव येथे नाका बंदी करण्यात आली, मात्र पोलिस दिसताच वाहन चालकाने वाहन वेगाने पळविले. पोलिसांनी या वाहनाचा पाटलाग केला असता त्या वाहन चालकांने वाहन थांबवून घटनास्थलावरुण पळ काढला.
पोलिसांनी सदर चारचाकी वाहन स्कॉर्पियो गाड़ी क्रमांक एम एच २९ व्ही२९९८ हे वाहन ताब्यात घेऊन वाहनाची झाड़ती घेतली असता सदर स्कॉर्पियो मधे भरपूर प्रमाणात दारुचा माल ताब्यात घेतला, सदर आरोपिच्या शोध घेतला असता आरोपी हा अंधाराचा फायदा घेऊन सोनेगांव येथील शेत शिवारातून पळून गेला.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश पांडे अतिरिक्त कार्यभार चिमुर यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्वप्निल धुळे, पोलिस हवालदार विलास निमगड़े, नायब पोलिस शिपाई किशोर बोढे, पोलिस शिपाई सचिन गजभिये, विनायक सरकुंडे, नायब पोलिस शिपाई कैलास वनकर, शरीफ शेख यानी पर पाडली.



















