सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, शिवाजी भोसले
दि.३०.०३.२०२०
फलटण- कोरोना विषाणु या संकटा विरूध्द पूर्ण देश लढत असून त्याच पार्श्वभूमी वरती विडनी गावात सांभाजी ब्रिगेड विडनी, महात्मा फुले युवक संघटना विडनी यांच्या सयुक्त विधमानाने आणि सांभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सातारा विशाल शिंदे, महात्मा फुले युवक संघटना अध्यक्ष सचिन अभंग याच्या माध्यमातून सामाजिक बांधीलकी जपत विडनी परीसरा मध्ये भवानी माता मंदिर, शिवनगर, काळे-भुजबळ वस्ती, काळुखे-शेंडे वस्ती, देशपांडे-काळे-नाळे, सावतामाळी रोड, सावातामाळी मळा , कोल्हे वस्ती,काळुखे वस्ती, चिंचामळा, विद्यानगर,गोठा जानुबाईचा आकुर,शिंदे मळा, आदलिंगे वस्ती, आसूं रोड-पाद या सर्व ठिकाणी जंतु नाशिक फवारणी करण्यात आली. यावेळी सुभाष अभंग, सुबोध शिर्के, संकेत शिर्के, राहुल शिर्के, पंकज शिंदे, दीपक नाळे, गणेश काळुखे, सुनील शिंदे, दिनेश अभंग, गणेश अभंग, शनी कर्ण, योगेश भुबबळ वैभब अभंग आदी कार्यकर्त उपस्थित होते.



















