सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, शिवाजी भोसले
दि.०१.०४.२०२०
फलटण- तरडगाव ग्रामपंचायत यांच्यावतीने कोरोना संसर्गजन्य रोगाचा फैलाव रोखण्यासाठी आपत्ती निवारण समिती तरडगाव यांच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे.
दि.३ मार्च ७ मार्च पर्यंत गावातील सर्व किराणा मालाचे व भाजीपाला दुकाने बंद राहतील. दवाखाने व मेडिकल सेवा वगळता कोणतेही सेवा चालू राहणार नाही. दुग्ध व्यवसाय धारकांनी सकाळी ६ ते ८ याच वेळेत दूध पुरवठा करावा. सर्व व्यवसायिकांनी व गावातील नागरिकांनी नोंद घ्यावी व सर्वांनी सहकार्य करावे असे अहवान ग्रामपंचायत तरडगाव व आपत्ती व्यवस्थापन समिती तरडगाव यांच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.



















