सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, शिवाजी भोसले
दि.१९.३.२०२०
फलटण- नगरपालिकेच्या वतिने अतिक्रमण हटाव मोहिम सुरू असताना फलटण शहरातील हॉटेल न्यू आनंद विलास या हॉटेलचे अनधिकृत बांधकाम काढत असताना हॉटेल मध्ये अवैध घरघुती वापराच्या अवैध गॅस सिलेंडर टाक्या सापडल्या असून हॉटेल मालकांवरती फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की फलटण शहरातील मध्यवर्ती ठिकाण जाणाऱ्या नागेश्वर मंदिराच्या बाजूलाच असणाऱ्या न्यू हॉटेल आनंद विलास या हॉटेल मालकाने अतिक्रमण करून आपल्या हॉटेल वरती दोन माजली अनधिकृतपणे पक्के बांधकाम केले होते फलटण नगर परिषदेच्या वतीने फलटण शहरात अतिक्रमणावरती नगर पालिकेने हातोडा मारला असून या हॉटेलचे अतिक्रमण काढतांना या हॉटेल च्या दुसऱ्या मजल्यावरती नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना कित्येक गॅस भरलेल्या व मोकळ्या असलेल्या गॅस च्या टाक्या मिळाल्या सदरच्या टाक्या ह्या नगरपालिकेने घेतल्या गेल्या. यानंतर फलटण तहसीलदार कार्यालयातील पुरवठा निरीक्षक मनोजकुमार जयसिंग काकडे वय ५३ वर्षे यांना फलटण प्रभारी तहसीलदार रमेश पाटील यांनी पुरवठा निरीक्षक मनोजकुमार काकडे यांच्याशी संपर्क करून फलटण नगरपरिषदेच्या वतिने चाललेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत हॉटेल न्यू आनंद विलास हे हॉटेल कापसे यांच्या हॉटेल वरील मजल्यावर अनाधिकृतपणे गॅस सिलेंडरचा साठा नगरपालिकेचे कर्मचारी यांना सापडला आहे. त्याठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले.
मुस्ताक महात यांनी बाजूला काढून ठेवलेल्या गॅस सिलेंडर साठ्याचा काकडे यांनी स्वत: दोन पंचासमक्ष जागीच पंचनामा करून एकूण ४३ गॅस सिलेंडर जप्त केले. त्यामध्ये ५ किलो क्षमतेचे भारत गॅसचे ४ मोकळे सिलेंडर, १४ किलोचा १ गॅस सिलेंडर भरलेला तसेच ५ किलो क्षमतेचा एच पी चा १ मोकळा गॅस सिलेंडर, १४ किलोचे १५ गॅस सिलेंडर, त्यापैकी गॅस सिलेंडर भरलेले आहेत.



















