पुणे(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.८/३/१९
पिंपरी, शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई)दुर्बल आणि वंचित घटकांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज मंगळवारपासून भरण्यास सुरुवात झाली. मात्र पहिले दोन दिवस संकेतस्थळ बंद असल्याने पालकांना अर्ज भरता आले नाहीत. गुरुवारीही संकेतस्थळ बंद असल्याने पालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
आरटीईच्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक यावर्षीही कोलमडण्याची शक्यता आहे. आरटीईची प्रवेश प्रक्रिया नवीन सत्रातील शाळा सुरु होण्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी जानेवारी अखेरपर्यंत शाळानोंदनी व फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पालकांना अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविणे महत्वाचे असते. शैक्षणिक वर्ष २०१९-२० वर्षासाठी ऑनलाईन शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली. यावर्षी १७६ शाळा आरटीईसाठी पात्र ठरल्या आहेत.
पहिल्या टप्प्यात आतापर्यंत प्रवेश होणे अपेक्षित होते. मात्र आता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामध्येही संकेतस्थळ पहिले दोन दिवस बंद होते.
❄ दहा आरटीई मदर केंद्र
आरटीई अंतर्गत प्रवेश अर्ज भरताना अनेकांना अडचणी निर्माण होतात. अर्ज भरताना कागदपत्रांची माहिती नसल्याने अर्ज करताना चुका होण्याची शक्यता असते. यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थी व पालकांच्या मदतीसाठी मदत केंद्रे उभारली आहेत. यामध्ये शहरात
☀ एस.पी.स्कुल(वाकड)
☀ बी.टी. मेमोरियलस्कुल(काळेवाडी)
☀ एम.एम.विद्यामंदिर(काळेवाडी)
☀ बिना स्कुल(आकुर्डी)
☀ इन्फट जीजस प्रायमरी स्कुल कासारवाडी
☀ ओअँसिस इंग्लिश स्कुल भोसरी
☀ न्यू एंजल्स इंग्लिश स्कुल तळवडे
☀ पँराडाईज इंटरनँशनल स्कुल चऱ्होली
☀ होरायझन स्कुल दिघी
☀ प्रिती स्कुल मोशी
ही केंद्रे आहेत.
❄ वेबसाईट सुरू झाली आहे. संपूर्ण राज्यामधून एकाच वेळी अर्ज केले जात आहेत. त्यामुळे वेबसाईट थोडीशी संथगतीने सुरू आहे. पुढच्या एक-दोन दिवसांमध्ये ती सुरळीत सुरु होईल.
दिनकर टेमकर (सहसंचालक,प्राथमिक शिक्षण विभाग)



















