बीड (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२८.१२.२०१९
आष्टी- शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध धंदे जोमाने वाढत असल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात मटका, बेकायदा वाळू वाहतूक, जुगार, गावठी दारू, अवैध प्रवासी वाहतुक असे अनेक धंदे राजरोसपणे चालू आहेत. पोलिसांकडून यावर कसलेच नियंत्रण नसल्याने जनतेकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तालूक्यातील बहुतेक सर्वच धाब्यावर दारू मिळत असल्याचे पाहायला मिळते. कडा शहरात चक्क मध्यवर्ती ठीकाणी गावठी दारू विक्री होते तर शेरी येथे टाकळी रोडला दारू काढत असल्याच्या तक्रारी जनतेतून होत आहेत. त्यामागे आर्थिक धागेदोरे अडकलेले असल्याने पोलीस या प्रकरणाकडे डोळेझाक करत आहे का असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.



















