पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२७.०५.१९
भोसरी- विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी इंद्रायणी मंगल कार्यालय भोसरी येथे रमजान महिन्यात रोझा “ईफ्तार पार्टी” आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यमान आ.महेश लांडगे यांनी मनापासून सर्वांना शुभेच्छा देत मी नेहमी परमेश्वराकडे प्रार्थना करतो कि लोक प्रतिनिधी म्हणून मला संधी दिली, माझ्याकडून लोकांची सेवा व्हावी हीच परमेश्वराकडे प्रार्थना करत असल्याचे सांगत दिल्या रमजानच्या शुभेच्छा.या वेळी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे,शिक्षण मंडळाचे माजी सभापती भाईजान काझी, आर पी आय पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक अध्यक्ष खाजा भाई शेख, पिंपरी-चिंचवड मुस्लिम महासंघाचे अध्यक्ष आजहर सिकंदर खान नगरसेवक लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड,भोसरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, एमआयडीसी स्पाईन रोड पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, चिखली पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के,फारूक इनामदार नितीन धोत्रे,फारूक कुरेशी, जमीरभाई शेख, तारीकभाई शेख, हाजी गुलाम रसूल सय्यद, असलम पठाण, झहीर भाई, जीशान सय्यद,जहीर चिकीलकर,असलम पठाण, हाबिबभाई शेख,फय्याज सनदी, निर्भिड पत्रकार प्रतिनिधी कलिंदर शेख यांनी या पार्टीला हजेरी लावली.
कार्यक्रमाच्या आयोजनात महेश लांडगे स्पोर्टस फौंडेशन व पिंपरी-चिंचवड शहर, मुस्लिम महासंघ यांचा सहभाग होता या रोजा इफ्तार पार्टी मध्ये जास्तीत जास्त मुस्लिम बांधवांनी उपस्थिती दर्शवली.



















