-
चंद्रपुर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि .१८/१२/१८
चिमूर,पळसगाव वनपरीक्षेत्रातील बफर झोन अंतर्गत आदिवासी बहुलगांव मौजा पळसगाव(पी) येथे शाम प्रसाद मुखर्जी जन – वन योजने अंतर्गत ईको डेवलपमेंट समिति तर्फे गावातील नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यास मिळावे या उदात्त हेतुचा विचार करुन गावातील नागरिकांचे अशुद्ध पाणी पिल्याने होणारे भयंकर आजरापासुन मुक्ति मिळावी, आरोग्य चांगले राहवे असा विचार करुण इको समिती पळसगांव यांचे मार्फत गावातील एकूण ७१७ ग्रामीण कुटुंबाना वाटर फिल्टर चे जलशुद्धिकरण यंत्राचे वाटप मा.मुरकुटे मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी पळसगाव,मा.गीता शेंडे सरपंच, मा.प्रभाकर गजभिये अध्यक्ष ईको समिती,वसंत बंसोड तंटा मुक्ती अध्यक्ष, मा. लोखंडे साहेब सचिव वनपाल,ईको समिती सर्व सदस्य गण, दुर्योधन खोब्रागडे, भूपेंद्र सोयाम, सुनील ठाकरे शाळा अध्यक्ष,मिलिंद शेंडे यांच्या उपस्थिती मध्ये वॉटर फिल्टर यंत्र वितरणाचा कार्यक्रम करण्यात आला.



















