चंद्रपूर)निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.१०.०७.१९
चिमूर- एकात्मिक पाणलोट व्यवस्थापण कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी चिमूर CIWMP-18 व उपजीविका संसाधन संस्था संत गाडगेबाबा व्यवसाय शाळा क्रीडा मंडळ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने परिचय /उपजीविका कौशल्य कार्यक्रम प्रशिक्षण महिला बचत गटाची कार्यशाळा मौजा पळसगांव येथे नुकतीच पार पडली. बुधवार गुरुवार(दि.९,१०जुलै) या दोन दिवसीय कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शक मा.आशिष ताजने नागपुर व संजय फंटे औरंगाबाद यांनी महिला बचतगट यांना बचत गटा मार्फत आर्थिक समृद्धी ,कौशल्य व्यवसाय कसल्या पदतीने करून आर्थिक समृद्धी या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले या कार्यमात मा. शेंडे साहेब, मेश्राम साहेब चिमूर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पार पडली असून पाणलोट सचिव मा. संजय सोनेकर यांच्या परिश्रमातून सदर कार्यक्रम करण्यात आला. दोन दिवसीय कार्यक्रमातून महिला बचत गटाला आर्थिक समृद्धी व ग्रामविकासाच्या बाबीची समजावून सांगण्यात आल्या या दोन दिवसीय कार्यक्रमात स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.



















