सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, चंद्रकांत सुतार
दि.०९.०३.२०२०
पाटण- जागतिक महिला दिनानिमित्त ‘एस मार्ट’ पाटण येथे पार पडलेल्या दुचाकी रॅलीसह विविध कार्यक्रमाला पारंपरिक वेशातील महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

महिला आता अबला राहिलेल्या नसून आपल्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या महिलांनी दुचाकी रॅली काढून जागतिक माहिला दिन साजरा केला.
रॅलीतील माहिलांनी पारंपरिक वेशात ‘जय जिजाऊ, जय शिवराय, माहीला शक्तीचा विजय असो…घोषणाने परिसर आनंदमय केला होता.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पाटण पोलिस स्टेशनच्या स.पो.नि. तृप्ती सोनवणे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे उद्देश स्पष्ट करत सौ.संगिता खांडके यांनी प्रस्तावना केली, तर स.पो.नि.सोनवणे यांनी स्वावलंबी जिवन जगण्याची शिकवण घेण्यास सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन ‘एस मार्ट’ च्या संचालिका सौ.साधना माळी यांनी केले होते. माळी यांनी कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी आकर्षक भेटवस्तू ‘ठुशी’ स.पो.नि.तृप्ती सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

या वेळी उपस्थित महिलांमधे अतिशय उत्साहाचे वातावरण दिसून आले ‘एस मार्ट’ च्या संचालिका सौ.माळी यांनी सर्वांचे आभार मानले.



















