चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२६.१२.१९
नागभीड- महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय येथे प्रोफेसर डॉ.साहेरा नसरीन यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तव्य करतांना “जर तुम्ही मानसिक व शारीरिकदृष्टया सक्षम असाल तर तुमच्या महाविद्यालयाचेच नाही तर तुमच्या समाजाचा व तुमच्या क्षेत्राचा विकास साधू शकता कुठल्याही वाईट कामामध्ये आपले श्रम वाया घालवू नका तर ज्ञानामधे सक्षम होऊन प्रगती करा व त्याचबरोबर कामामध्ये, वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा व एकनिष्ठपणा असेल तर आपणास कुठलेही ध्येय गाठता येते. असे सांगून आपणास संशोधनासाठी विविध संसाधन खुले आहेत त्याचा वापर समोरील शिक्षणासाठी करा. असे मार्गदर्शन राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथे वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात डॉ. साहेरा नसरीन, प्रोफेसर, शासकीय विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल एन. कोरपेनवार होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अनिल कोरपेनवार यांनी विध्यार्थ्यांना समाजातील विविध प्रश्नांची जाणीव असायला हवी व ते प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याकडे असणाऱ्या स्रोतांचा उपयोग परिपूर्ण करायला हवा यातून आपले व्यक्तिमत्व विकसित होईल, असे सांगून महाविद्यालयाने अल्पावधीत जी प्रगती केली व जो समाजामध्ये विश्वास निर्माण केला आहे. तो कायम ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी नाथ जुळवून ठेवली पाहिजे. असे सांगितले.
उपरोक्त कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रोफेसर, डॉ. साहेरा नसरीन, यांनी महाविद्यालयाच्या नवसंशोधन केंद्राला भेट देऊन विविध वनौषधींची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल एन. कोरपेनवार यांचे कडून जाणून घेतली.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल एन. कोरपेनवार यांचे हस्ते प्रोफेसर डॉ. साहेरा नसरीन, यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.उपरोक्त कार्यक्रमाचे संचालन डॉ. विकास मोहतुरे यांनी केले तर आभार डॉ. आर. जे. रुडे यांनी मानले.उपरोक्त कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी डॉ. जी. डी. देशमुख, प्रा. निलेश गोडे, डॉ. अतुल नागपुरे, प्रा. मनीष मत्ते प्रा. चक्रधर भुररे तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.



















