पिपरी(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२०.०६.२०२२
पिपरी- काळेवाडी कुणाल हॅाटेल ते रहाटणी फाटा येथे नागरिकांना सुरक्षित वावरणे अक्षरश: मुश्कील झाले आहे. कुणाल हॅाटेल शेजारीच खाजगी बस थांबा आहे या थांब्याचे जवळच विक्रांत वाईन शॅाप आहे या वाईन शॅापमधून दारू घेवून रस्त्याच्या कडेला खुलेआम तळीराम दारू पित बसलेले असतात. रस्त्याच्या बाजूला फुटपाथ आहे या फुटपाथवर बिनधास्त दारू पिणे व हुल्लडबाजी सुरू असते.त्यामुळे या फुटपाथचे रूपांतर बार मध्ये झाले की काय असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.याच प्रकाराचा जवळील सोसायटीतील नागरिकांना व रात्रीच्यावेळी जे नागरीक शतपावली करायला घराबाहेर जातात त्यांना तसेच पादचाऱ्यांना या दारू पिणाऱ्यांचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. काळेवाडी परिसरात अनेक रस्त्यावर तळीरामांचा वावर वाढला आहे. परिसरातील हुल्लडबाजांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.पण पोलिसांचे मात्र या प्रकरणाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.



















