सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, सुभाष जाधव
दि.१२.३.२०२०
फलटण- कृषी व संलग्न महाविद्यालय बारामती शारदानगरच्या राष्ट्रीय खेळाडू व तसेच साखरवाडी विद्यालय साखरवाडी च्या खेळाडूंनी देखील राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
तिरुपती आंध्र प्रदेश येथे झालेल्या कृषी अंतर अंतर विद्यापीठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या संघामधे बारामती कृषी महाविद्यालयाच्या ऋतुजा संजय बोडरे, राधिका सतीश पाटील व स्वरांजलि विलास कोकरे यांचा समावेश होता. तसेच यांची प्रथम लढत बिकानेर राजस्थान ला झाली हा सामना संघाने एक डाव १९ गुणांनी जिंकला त्यानंतर उपांत्य फेरीचा सामना बागलकोट कर्नाटक असा ऋतुजा बोडरे करत ४०० मि. तीन गडी बाद केले. राधिका पाटील हिने १.३०मि संरक्षण केले व स्वरांजली कोकरे हिने तीन गडी बाद केले अंतिम फेरीचा सामना बेंगलोर यु एस सोबत झाला यामधे ऋतुजा बोडरे हिने ५.२०मि. पण करत ४ गडी बाद केले
स्वरांजली कोकरे हिने दोन गडी बाद केले व राधिका पाटील हिने १.०मि. संरक्षण करत संघ अंतिम फेरीत विजय चालला तसेच गोहाटी आसाम येथे खेलो इंडिया स्पर्धेत प्रांजल प्रमोद माळकर हिची निवड झाली या स्पर्धेमध्ये प्रांजल माडकर हिचा संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात मोलाचा वाटा होता त्याबरोबरच उत्तर प्रदेश येथे झालेल्या देखील स्पर्धेत कांस्यपदक मिळवून देण्यात कुमारी पूजा फडतरे हिचा वाटा होता या साखरवाडी विद्यालय साखरवाडीच्या खेळाडुंनी मिळवलेल्या घवघवीत यशाच्या अभिनंदन करत करण्यासाठी माननीय अजितदादा पवार यांनी सहयोग बारामती येथे राष्ट्रीय खेळाडूंची पुष्पगुच्छ देऊन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन कौतुकास्पद अभिनंदन केले
यामधे कृषी महाविद्यालयाचे मार्गदर्शक काजी सर, प्राचार्य नलवडे सर यांचे सहकार्य लाभले व साखरवाडी विद्यालयाचे मार्गदर्शक संजय बोडरे( दादोजी कोंडदेव पुरस्कार) यांचे सहकार्य लाभले.



















