पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.३१.०५.१९
पिंपरी- केंद्रीय कॅबिनेट मंत्री पदी रामविलास पासवान यांची काल शपथविधी झाली त्या प्रित्यार्थ पिंपरी चिंचवड शहर लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आली.
पासवान यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमधे उत्साह निर्माण झाला आहे.
पिंपरीतील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी लोकजनशक्ती पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक गिरणे,प्रदेश सचिव धुराजी शिंदे,प्रदेश युवा सचिव सचिन जाधव, मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष शिवाजी झोडगे,बंजारा प्रकोष्ठ महाराष्ट्र राजकुमार चव्हाण,पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष सचिन भेंडे,शहर उपाध्यक्ष नवनाथ धोत्रे,गिरीश सोनवणे,आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा अल्पसंख्याक विभाग लोकजनशक्ती पार्टी अध्यक्ष नसीमभाई शेख यांनी केले.



















