सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, शिवाजी भोसले
दि.१८.०३.२०२०
सातारा- कोरोना विषाणूच्या प्रसाराने संशयतांची संख्या दिवसे दिवस होत असलेली वाढ लक्ष्यात घेता दि.१९ मार्च पासून ८ दिवस जिल्हातील सलून व्यवसायकांनी सलून व्यवसाय बंद करण्याचा निर्णय जिवा सेना सातारा जिल्हा कार्यकारणी घेतला असल्याची माहीती जिवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष विशाल पवार यांनी दिली.
सलून व्यवसायिक व ग्राहक यांच्याशी जवळून संपर्क येत असतो त्यामुळे सलून व्यवसाय धारकाला याचा संसर्गजन्य आजार होऊ शकतो यामुळे सर्व सलून व्यवसाय धारकांनी स्वतःच्या सुरक्षेखातर दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल पवार यांनी सांगून जर कोरोना व्हायरस आठ दिवसात आटोक्यात न आल्यास ३१ मार्च पर्यत दुकाने बंद ठेवण्यात येतील असेही सांगितले



















