सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
अनिल माने
दि.२/१२/१८
पाटण,पाटणचे सामाजीक कार्यकर्ते महेश मुळे आज सकाळी अचानक पाटण ग्रामीण रुग्णालयास भेट देवून येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव यांना खोकल्या संबंधी पाच लिटर औषधांची भेट दिली.यावेळी औषधाविषयी अधिक माहिती देताना महेश मुळे म्हणाले सदरचे औषध दर्जेदार असून त्यामध्ये योग्य प्रमाणात घटक द्रव्य आहेत याचा फायदा रुग्णांना होईल.पाटण ग्रामीण रुग्णालयात अनेक दिवसापासून वेग वेगळ्या औषधांची कमतरता आहे ती वरिष्ठ पातळीवरून तातडीने पूर्ण करण्याबाबत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात येईल याचबरोबर समाजातील सुज्ञ नागरीक धानशूरव्यक्तींनी औषधाचा पुरवठा गरजू रुग्णांना वेळेत व्हावा यासाठी विना विलंब शक्य त्या प्रमाणे आर्थिक अथवा थेट औषधांची मदत करावी असे आव्हान सामाजीक कार्यकर्ते महेश मुळे यांनी केले आहे.यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव,डॉ.नंदकुमार चव्हाण व सामाजीक कार्यकर्ते महेश मुळे यासह पाटण ग्रामीण रुग्णालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.



















