सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,अनिल माने
दि.५/१२/२०१८
पाटण, ग्रामीण रुग्णालय पाटण येथे महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग कार्यक्रमांतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम,जिल्हा रुग्णालय,जिल्हा परिषद आरोग्य विभाग,ग्रामीण रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ताण-तणावामुळे निर्माण होणाऱ्या आजाराचे निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले.सदर शिबीरामध्ये ताण तणावाची लक्षणे,चिडचीड होणे,झोप न लागणे,विस्मरण होणे,छातीत धडधडणे, निराशवाटणे, नकारात्मक विचार येणे,अस्वस्थपणा,कामात लक्ष न लागणे.यावर निदान,उपचार व समुपदेशन करणेत आले.यावेळी मनोविकारतज्ञ, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट,समुपदेशक,मनोविकृती परिचारीका व इतर दहा जणांच्या पथका कडून रुग्णांची तपासणी, उपचार व समुपदेशन करण्यात आले.ताण तणावाचे व्यवस्थापन,रिलॅक्सेशन थेरपी व भावनिक आरोग्य तपासणी करण्यात आली.ग्रामस्थांना नैराश्य किती प्रमाणात आहे त्याची तपासणी करण्यात आली. नैराश्य आणि आत्महत्या या आजाराबद्दल तपासणी करून सखोल माहिती व मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर मोफत तपासणी व औषधे देण्यात आली व ५५ वर्षावरील वृद्धांची विस्मरण तपासणी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सभापती सौ.उज्वला जाधव पं.स.पाटण, मान्यवर मा.उपसभापती श्री.राजाभाऊ शेलार, यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.अभिजीत घोरपडे, डॉ दीपक साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत यादव वैद्यकीय अधीक्षक, श्रीम.वाघमारे तसेच ग्रामीण रुग्णालय पाटण येथील कर्मचारी व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















