चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०८.०२.२०२०
चंद्रपूर- आयोजित करण्यात आलेल्या कृषी मेळाव्याला पूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद हजारो संख्येने मिळाला..
या कृषी मेळाव्याचे आयोजन धनोजे कुणबी समाज चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले आहे. समाज मंडळाचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम सातपुते यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कृषी महोत्सवाला, श्रीधर मालेकर, विनायकराव जी धोटे, अतुल देऊलकर, विनोद पिंपलशेंडे, प्रभाकर पारखी, विलास माथनकर, सुरेश ढवस, अरुण मालेकर, शैलेश गुंजेकर, आनंदराव वैद्य, अस्मिता गौरकार, मीनाताई माथनकर, अरविंद मुसळे, प्रभाकर दिवसे, सुभाषराव गोहोकार या समाज मंडळीच्या कार्यकारणीची मोलाची मदत लाभली. सर्व सभासदांनी अथक परिश्रम घेऊन हा भव्य दिव्य कृषी मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी विविध शेती व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याची प्रदर्शनी, महिला बचत गट, लहान गृह उद्योग, आणि खाद्य पदार्थांनी युक्त तसेच समाजातील महिला आणि मुलींचे नृत्य आविष्करणे हा कार्यक्रम फुलला आहे.
या कार्यक्रमात चंद्रपूर मधील प्रसिद्ध 68 ते ७० डॉक्टरांनी मोफत आरोग्य तपासणी व औषध विक्रेत्यांनी मोफत औषधे वाटप गरजू ना केले यात हृदयरोग, फिजिशियन, अस्थीरोग, स्त्री रोग तज्ज्ञ, बाल रोग तज्ज्ञ, डेंटिस्ट , कान नाक घसा.. अश्या सर्व डॉक्टरांनी आपला अमूल्य वेळ देऊन या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या मेळाव्याला दिला. सर्व महिला बचत गटांच्या घरघुती बनवलेले व्यंजनाचा आस्वाद, व शेतकऱ्यांचा शेतातील तांदूळ, भाजीपाला, डाळ , असे विविध प्रकारच्या मालाचे स्टॉल लागलेले आहेत.. शेतकऱ्यांना नवं तंत्रज्ञान असेलेले अवजारे, मशीन, बियाणे , अश्या एका जागेवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. दि.८ व दि. ९ फेब्रुवारी अश्या दोन दिवस चालणाऱ्या मेळाव्याला समाज बांधवांनी प्रत्यक्ष येऊन अनुभव घ्यावा.
या कार्यक्रमात कृषी विषयक तज्ज्ञ, गटशेती तज्ज्ञ, यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा मेळावा खुप सुंदर झाला.. व शेतकऱ्यांना नवीन कल्पना यातून नक्कीच मिळाल्या असतील. पण मित्रांनो आज दि.९ फेब्रुवारी रविवारला पुन्हा यापेक्षाही अनेक प्रयोग, अनेक मार्गदर्शन आयोजित केलेला कृषी मेळाव्यात आपण सर्वांनी यावे.



















