चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, योगेश्वर शेंडे
दि.३०.०३.२०२०
नागभीड- जगात कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव बघता देशाची आर्थिक परिस्थिती बघता मंदी चे सावट पसरले असून मा राज्याचे मुख्यमंत्री यांनी कोरोना ग्रस्त वेंकतीच्या कुटुंबना आर्थिक मदत करण्यासाठी विनंती केली आहे,
कोरोना पासून बचाव करण्यासाठी अद्याप कोणतीही जगाने लस शोधण्यात यश आले नसल्याचे दिसून येत आहे. या विषाणूपासून बचावासाठी स्वतःच खबरदारी घेण्याचे आवाहन शासन करीत आहे. परंतु मुबलक प्रमाणात साहित्य नसल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.आपल्या आपल्या देशा प्रति काहीतरी देने हा मुख्य हेतू ठेवूंन मौजा येनोली माल येथील सरपंच
अमोल व्हि बावनकर यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले एका महिन्याचे मानधन जमा करण्यासाठी गट विकास अधिकारी प. स.नागभीड यांना निवेदनाद्वारे केली आहे.सद्या देशावर कोरोना या विषाणूमुळे जे संकट आले आहे त्यापासून लढण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार जे मदत करत आहेत त्यामध्ये आपणही सहभागी झाले पाहिजे या हेतूने आपले एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधी मधे देण्यात आले आहे. देशावर आलेल्या संकटाला मात करण्यासाठी सर्व बांधवाना शासनाचे नियम योग्य रीतीने पाळावे तरच आपण कोरोना वर विजय मिळवू असे मत सरपंच प्रसार माध्यमातली प्रतिनिधी जवळ वेक्त केले आहे.



















