चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.११.०२.२०२०
चिमूर- हिंगणघाट येथे एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या तरुणीला आरोपी विकेश नगराळे याने सात दिवसा पूर्वी पेट्रोल टाकुन पेटवून दिल होत. तिचा उपचार नागपूर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होता. उपचारादरम्यान पिडीतेने अखेरचा श्वास सोमवारला पहाटे सोडला. या प्रकरणाचा निषेध करून चिमूर तालुका कुणबी समाज, सर्वसमावेशक संघटन समिती व सर्व पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर मंगळवार ला दुपारी मुकमोर्चा काढन्यात आला. त्या नराधमाला फाशी द्या अशी मागणी निवेदनातुन मुख्यमंत्री उद्धध ठाकरे यांना केली आहे. पिडीत तरुणी सकाळी घरूण कॉलेजला जात असताना आरोपी विकेश नगराळे यांनी रस्त्यात अडवून गाडीतील पेट्रोल काढुन अंगावर शिडकुन पेटवून दिले. सात दिवसाच्या उपचारानंतर पिडीतेला सोमवार ला अॅटक आला दरम्यान पहाटे तिची प्राणज्योत मालवली या प्रकरनाच्या निषेधार्थ कुणबी समाज, सर्वसमावेशक संघटन समिती व सर्व पक्षाच्या वतीने मंगळवारला दुपारी अडीज वाजता गुरुदेव सांस्कृतीक भवण वडाळा ( पैकु ) चिमूर येथुन मुकमोर्चा काढन्यात आला. थेट मुकमोर्चा तहसील कार्यालयावर पोहचला तहसिल कार्यालयात मुकमोर्चाचे सभेत रूपांतर करन्यात आले. दोन मिनीटाचे मोहन श्रध्दाजली पाळून उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठवीण्यात आले. निवेदनात त्या नराधा माला फाशीची शिक्षा व अशा घटना पुनश्च होवू नये याकरीता कठोर कायदा करन्यात यावा असे म्हटले आहे.
निवेदन देताना कॉंग्रेसचे डॉ सतिश वारजुकर, रोशन ढोक, विनोद ढाकुणकर, भाजपाचे जि.प. उपाध्यक्ष रेखा कारेकर, डॉ श्याम हटवादे, डॉ दिलीप शिवरकर, मनसेचे प्रशांत कोल्हे, राष्ट्रवादीचे रमेश कराळे, योगेश ठुने, वंचीत आघाडीचे स्नेहदिप खोब्रागडे, शिवसेनेचे रमेश भिलकर, अनिल डगवार, प्रा. संजय पिठाडे, सुभाष शेषकर, डॉ संजय बोढे, डॉ महेश खानेकर, एकनाथ थुटे, विलास वडस्कर, विजय गावंडे, राजू देवतळे, बकाराम मालोदे, योगीता थुटे, वंदणा शेषकर, छाया कंचर्लावार, शिल्पा राचलवार, चेताली ठुसे, भारती गोडे, जयश्री निवटे, आदी उपस्थित होते. मुकमोर्चात शहरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक, प्राध्यापक, समाजीक संघटना पदाधीकारी, समाजसेवक, सर्व पक्षाचे पुढारी सहभागी झाले होते.



















