बीड(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क ) प्रतिनिधी,अमोल साखरे
दि.१२/१२/१८
आष्टी, तालुक्यातील केरुळ येथील आंधळे वस्ती मधील गणेश एकनाथ आंधळे यास आदन्यात व्यक्तिने दि.१२ डिसे. दुपारी ४ च्या सुमारास अपहरण केल्याची माहीती गणेश ची आई सुरेखा एकनाथ आंधळे यांनी आष्टी पोलिस स्टेशनला दिली. गणेश चे आई वडील ऊसतोड कामगार असून १२डिसे.गणेश झोपेत असतानाच ऊसतोडनीसाठी गेले होते, बहिण अश्विनी गणेश दोघेच घरी होते गणेश घराबाहेर खेळायला गेला तो घरी परतलाच नाही. याचा इतरत्र नातेवाईकाकडे शोध घेऊन ही नसापडल्याने त्याचे आदन्यात व्यक्तिने अपहरण केल्याची तक्रार पोलिस स्टेशनला दिली आहे.



















