उस्मानाबाद(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२३.०२.२०२०
लोहारा- तालुक्यातील सास्तुर येथील भुकंपग्रस्त भागात स्पर्श ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे. दर्जेदार व सतत्यपूर्ण आरोग्य सेवेमुळे जवळपास ३०० गांवामधून रुग्णाचा ओढा स्पर्श सास्तूर येथे आहे. आरोग्य सेवेचा दैदिप्यमान कामामुळे आगळा वेगळा ठसा ग्रामीण भागात उमटविला आहे. शिस्तबद्ध नियोजन, उत्कृष्ट टीमवर्क व परिणाम कारक देखरेख यामुळे दर्जेदार आरोग्य सेवा देण्यात यशस्वी झाले. अद्यावत विपुला माता व बाल संगोपन कक्ष, नवजात शिशु स्थिरीकरण कक्ष व शस्त्रक्रियागार यामुळे ग्रामीण भागातील जनतेसाठी एक वरदान ठरले आहे, असे उदगार नामदेव कदम, असिस्टंट जनरल मँनेजर जनरल इन्शुरन्स कंपनी मुंबई यांनी काढले. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत स्पर्श ग्रामीण रुग्णालयास अद्यावत सी – आर्म, अँलन काँटरी शस्त्रक्रिया टेबल व कलर डॉपलर सोनोग्राफी मशीन देण्यात आली. नीती आयोगाच्या अहवाला नुसार उस्मानाबाद जिल्हा हा आन्काक्षित जिल्हा असून ग्रामीण भागातील जनतेसाठी दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात त्याच्या आरोग्यावरील खर्च कमी होऊन तो त्यांच्या इतर गरजा भागविण्यासाठी व्हावा यासाठी जी आय सी ने स्पर्श ग्रामीण रुग्णालयस अद्यावत वैद्यकीय उपकरणे दिली त्यांचा योग्य उपयोग होऊन अधिकाधक शस्त्रक्रिया व्हाव्यात अशी भावना नामदेव कदम यांनी व्यक्त केली. त्यांच्या हस्ते सोनोग्राफी युनिट, सी-आर्म व अँलन काँटरी समाजासाठी समर्पित केले. आपल्या भेटी दरम्यान त्यांनी मोबाईल मेडिकल युनिटला पेठसांगवी येथे भेट देऊन रुग्ण व नातेवाईकांशी संवाद साधला. प्रत्येक उपक्रमा मध्ये आग्रहपूर्वक लोकांनी सहभागी व्हावे व उपक्रम यशस्वी करावे असे आवाहन केले. सर्व प्रथम स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ.आर.बी.जोशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. आणि स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर कामाच्या आढाव्याची पी.पी.टी सादरीकरण केले. त्यांना रुग्णालयात कोणत्या व कश्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती पी.पी.टी. द्व्यारे सादरीकरण करण्यात आले. आपल्या भेटीदरम्यान नामदेव कदम यांनी प्राइड इंडिया स्पर्शची संपूर्ण पाहणी केली कर्मचारी, रुग्ण, नातवाईक यांच्याशी संवाद साधला. स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या इतर सामाजिक उपक्रमाची माहिती घेऊन त्यांनी स्पर्शच्या आरोग्य क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले व जी आय सी मार्फत देण्यात आलेल्या वैद्यकीय उपकरणाचा योग्य वापर होणेसाठी सूचना देल्या. या प्रसंगी विपुला माता व बाल संगोपन कक्षात स्त्री जन्माचे स्वागत म्हणून, स्त्री जन्मलेल्या मातेस भेटवस्तू नामदेव कदम यांच्या हस्ते देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्तविक स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी केले. स्पर्श ग्रामीण रुग्णालय चा प्रत्येक कर्मचारी त्याला दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे संपूर्ण योगदान देऊन पार पाडतो म्हणूनच स्पर्शने आजपर्यंत आरोग्य सेवेत यशस्वी वाटचाल केली असल्याचे प्रतिपादन केले. या प्रसंगी नामदेव कदम यांच्या सुविज्ञ पत्नी श्रीमती प्रतिभा नामदेव कदम, कार्यक्रम प्रमुख श्रीमती संगीता दश्मोह्पात्रा, उमेश तांडेल, सर्व वैद्यकीय अधिकारी, स्पर्श रुग्णालयाचे कर्मचारी, ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेवटी डॉ.आर.बी. जोशी यांनी आभार मानले.



















