बीड(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०५.०६.२०२२
आष्टी- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयसीआयसीआय फाउंडेशन मार्फत सराटे वडगाव आनंदवाडी येथे वृक्ष रोपण करून करण्यात जागतिक पर्यावरणदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आय सी आय सी आय फाउंडेशन झोनल हेड मोनिका आचार्य,मराठवाडा विभाग प्रमुख श्री.दीपक पाटील उपस्थित होते.

मोनिका आचार्य यांनी महिला व शेतकरी यांच्याशी संवाद साधत शेतीतून आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी पीक पद्धतीत कोणकोणते बदल केले पाहिजे तसेच पाण्याचा योग्य वापर करून पिक उत्पादन वाढवता येईल याविषयी मार्गदर्शन केले. आय सी आय सी आय फाउंडेशन व लोकसहभागातून दुसऱ्या टप्प्यातील नदी खोलीकरण व रुंदीकरण कामामुळे गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्नच शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास नक्किच मदत होनार असल्याची माहीती दिली. दोन वर्षापासून आय सी आय सी आय फाउंडेशन सराटे वडगाव,आनंदवाडी गावात काम करत असून गांडूळ खत बेड, शेळीपालन, चिंच प्रक्रिया उद्योग, मुरघास, जीवामृत, फळबाग लागवड कामाची पाहणी करण्यात आली व या बाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास आय सी आय सी आय फौंडेशन जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री.चेतन पाटोळे, सीएफ यशवंत बहिरम, सरपंच प्रा.डॅा.रामकृष्ण बोडखे, ज्येष्ठ नागरिक राजाराम नन्नवरे, ईश्वर नन्नवरे, अझहर शेख, राजेश बोडखे, शिवाजी मिसाळ, सराटे वडगाव, आनंदवाडी येथील महिला व शेतकरी उपस्थित होते.



















