सांगली (निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.१४.१०.२०२०
सांगली- वाळवा तालुक्यातील कापुसखेड या गावातील तरुणाला जागरूक सर्पमित्रमुळे जीवनदान मिळाले. या बाबात अधिक माहिती अशी की, गणेश कृष्णा पवार रात्री 9.30 वाजता गावातील जिल्हा परिषद शाळा नंबर एक येते असलेले गेट जवळच्या कट्यावर बसले होते. अंधारात त्यांच्या पायात काही तरी चावलं पण काय चावलं या कडे त्यांनी दुर्लक्ष केले. काही वेळा नंतर लक्षणें दिसू लागली पायात सूज येत होती, चक्कर येणं सुरु झालं. लगेच त्यांनी गावातील पिपल फॉर अनिमल्सचे प्राणीमित्र युनूस मणेर यांना संपर्क करुन या बाबत माहिती दिली. मणेर यांनी सविस्तर माहिती घेतली या लक्षणे वरून साप चावला असावा असं अंदाज त्यांनी बांधला.त्यांना धीर देत त्वरित त्यांनी गणेश पवार यांना सांगली सिविल हॉस्पिटलला येते दाखल केले. डॉक्टरने तपास केली असता साप चावला असल्याचा स्पष्ट केला. अँटी स्नेक विनोम, औषध देऊन विषची मात्रा कमी झालं. आता सुखरूप असल्याचे डॉक्टरनी सांगितलं आहे.



















