सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२४.३.२०२०
फलटण- जिंती येथिल शेती महामंडळचे क्षेत्र खाजगी कंपनीने भाडे कराराने घेतले आहे या क्षेत्राला रस्त्याच्या बाजूने तारेचे कंपाउंड केलेला आहे. या कंपाउंडला इलेक्ट्रिक करंट/विद्युत प्रवाह दिल्यामुळे जिंती येथील सुरेश घाडगे यांचे मेंढी जबर जखमी झालेले आहे. जिंती गावात लोकवस्तीच्या जवळ तारेच्या कंपाउंडला डीपी मधून अनधिकृत वीज वीज जोडवी करून गावातील लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार अनेक दिवसापासून सुरू आहे. या फार्मचे मॅनेजर श्री.वाघमोडे यांना याबाबत ग्रामस्थांनी या घटनेबद्दल विचारले असता उडवाउडवीची देत लोकांना दमदाटी करत आहेत. मेन डीपी वरून वीज चोरी होत असताना महावितरण अधिकारी दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. जिंती ग्रामस्थांच्यावतीने या फार्मवर व मॅनेजर वाघमोडेवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.



















