सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१४.०२.२०२०
पाटण- जि.प.शाळा अडूळपेठ येथे बालआंनद मेळावा मान्यवरांच्या उपस्थित उत्साहात पार पडला. अडूळपेठ डिगेवाडी
नाडोली अडूळ गावठाण सूभाषनगर नाडे यांचा संयुक्त बालआंनद मेळावा जि.प.सदस्य विजय पवार, प.स.सदस्य शिरवाडकर, प.स.सदस्य पानसकर, संरपच विनायक शिर्के, नाडोली संरपच अरविंद पवार, शाळेचे केंद्रप्रमूख, मुख्यध्यापक, शिक्षक,पालक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध शाळेचे विद्यार्थी यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले विद्यार्थीना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. यावेळी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.



















