उस्मानाबाद (निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२७.१२.१९
कळंब- शहरातील जुगार, दारूचा अड्डा, लैंगिक चाळ्याचं केंद्र बनलेली जिल्हा परिषदेची जुनी इमारत तात्काळ जमीन दोस्त करण्यासाठी माजी नगरसेवक शिवाजी कराळे यांनी जिल्हा परिषद उस्मानाबादचे मुख्यधिकारी यांना निवेदन दिले अाहे.
याबत अधिक माहिती अशी की कळंब शहराच्या मध्यभागी असणाऱ्या जिल्हा परिषदेची कालबाह्य (जुनी) तथा वापरात नसलेली इमारत अाहे. या इमारतीच्या शेजारी नविन इमारतीत शाळा स्थांलातरित झाली अाहे. या शाळेत १५० मुले व २५० मुली प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेत अाहेत. इमारत कालबाह्य झाल्यामुळे ती शाळकरी मुलांवर कोसळण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. तसेच दिवसा शाळा चालु असताना जुन्या इमारतीत गांजा पिणारे, दारू पिणारे, पत्ते खेळणारे जुगारी तथा दारूडे नेहमी पहावयास मिळतात. अशा प्रसंगी एखाद्या अडाणी, असंस्कृत, बुरसटलेल्या विचार सरणीच्या, गुन्हेगारी प्रवृतीच्या, विकृत मानसिकतेच्या इसमाने शाळेतील किंवा बाहेरील मुलीस जुन्या इमारतीत नेऊन तिच्यावर अतिप्रसंग होण्याची भिती सद्यस्थितीत हैद्राबाद/ उन्नाव येथे घडलेल्या दुर्देवी घटनेवरून होऊ शकते असे निवेदनात नमुद केले अाहे. संध्याकाळी या इमारतीत लाईट ची व्यवस्था नसल्यामुळे व वर्दळ नसल्यामुळे येथे स्मशानरूपी शांतता असते. त्यामुळे या इमारतीचा राञी गैरकृत्यासाठी हि वापर होत अाहे. निवेदन देऊनही विनयभंग किंवा बलात्कार सारखी घटना घडली तर याची सर्वस्वी जबाबदारी जि.प. चे मुख्यधिकारी यांच्यावर राहील असे निवेदनात म्हटले अाहे. इमारत तात्काळ निष्कासीत नाही केली गेली तर २६ जानेवारी रोजी तिव्र अांदोलन करण्याचा इशारा शिवाजी कराळे यांनी निवेदनाद्बारे दिला अाहे. निवेदनावर लक्ष्मण करंजकर, राजु सय्यद, गोकुळ मंडाळे, तालेब बागवान, नितीन घोंगडे, प्रितम पंडीत, अाबेद बागवान, रहीम पठाण, सोहेल बागवान, अमोल बारटक्के यांच्या स्वाक्षर्या अाहेत.



















